Tuesday, February 28, 2017

अस्वस्थता आणि कला



कोणतीही कला पूर्णत्वासाठीच्या झगड्यातून, त्या अस्वस्थतेतूनच जास्त झळाळते असं मला वाटतं.

ही अशी परिस्थिती म्हणजे दुर्दशा हे आपण मानतो. पण प्रत्यक्षात त्या कलाकाराला याहून काही जास्त मिळालेले असू शकते जे आपल्याला दिसत वा कळतही नसेल. स्पेसिफिकली अवलिया कलावंतांचे आनंदाचे मापदंडच वेगळे असू शकतात न?

अगदी, आणि मग त्यातून सृजनही नाही. म्हणजे शांततेत सगळं मिळाल्यामुळे नवनिर्मिती नसेल न

कलेचा त्रास? मला नाही वाटत. कला हे माध्यम असतं काही शोधण्याचं. आणि तो शोध हेच जगणं. त्याचा त्रास कसा होईल? 

असेलही पण तो त्या व्यक्तीपुरता राहील मला वाटतं. कारण मग व्यक्त होण्याची गरजच संपेल ???

जो वर ही अपूर्णतेची जाणीव असेल तोवरच धडपड असेल, अन ही धडपड हेच सृजन वाटतं मला. पूर्णत्व मिळालं की थांबेल न ही धडपड?

माझी कला समाजात सिध्द होण्याची धडपड अपेक्षित नाही. तर कला मला साध्य व्हावी ही धडपड अपेक्षित आहे. म्हणजे मुकुलजींसारख्या अवलिया कलाकारांसंदर्भात म्हणतेय मी.

No comments:

Post a Comment